12th Board Exam 2027: Form Filling Process

12वी HSC Board Exam 2027 Form Filling: Step-by-Step Process

महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी HSC February–March 2027 परीक्षेसाठी Form Filling प्रक्रिया सुरू आहे. Regular विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 October 2026 आहे. अर्जाची प्रक्रिया College मार्फत SARAL system वर केली जाते.

Form भरताना माहिती चुकीची भरली तर पुढे अडचण येऊ शकते. त्यामुळे Form मधील प्रत्येक detail College च्या record प्रमाणेच भरा.

Step 1: College Details

Form च्या सुरुवातीला तुमच्या College ची माहिती असते.

यामध्ये School Index No., UDISE No., Application Serial Number आणि Centre Number असतात.

हे details स्वतः अंदाजाने भरू नका. तुमच्या Junior College कडून confirm करूनच भरा.

Step 2: Personal Details

यानंतर तुमची personal information भरायची आहे.

यामध्ये:

  • Last Name / Surname
  • Candidate’s Name
  • Middle / Father’s Name
  • Mother’s Name
  • Residential Address
  • PIN Code
  • Mobile Number
  • Date of Birth
  • Aadhaar Number

ही माहिती तुमच्या official records प्रमाणेच भरा.

Step 3: Stream निवडा

तुमची stream योग्य प्रकारे select करा:

  1. Science
  2. Arts
  3. Commerce
  4. HSC Vocational

उदाहरणार्थ, तुम्ही 12वी Science चे विद्यार्थी असाल तर Science निवडा.

Step 4: Gender

तुमच्या applicable option नुसार Gender select करा:

  • 1 → Male
  • 2 → Female
  • 3 → Trans Gender

Step 5: Minority Religion

तुमच्यावर लागू असलेला option निवडा.

  • 0 → Non-Minority
  • 1 → Muslim
  • 2 → Christian
  • 3 → Buddhist
  • 4 → Sikh
  • 5 → Parsi
  • 6 → Jain

Step 6: Category

तुमच्या official caste/category certificate किंवा College record प्रमाणे Category भरा.

यामध्ये SC, ST, VJ(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC, OPEN आणि इतर applicable categories आहेत.

Category अंदाजाने निवडू नका. College record प्रमाणेच माहिती भरा.

Step 7: Divyang

तुम्हाला लागू असल्यास योग्य Divyang option निवडा.

लागू नसेल तर 0 – No Handicapped option आहे. इतर options मध्ये Blind, Deaf, Orthopedically Handicapped, Dyslexia, Autism इत्यादी आहेत.

Step 8: Medium of Instruction

तुमच्या 12वीच्या medium प्रमाणे option निवडा.

उदा. English medium असल्यास English निवडा.

इतर options मध्ये Marathi, Gujarati, Kannada, Urdu, Sindhi आणि Hindi यांचा समावेश आहे.

Step 9: Type of Candidate

हा भाग थोडा महत्त्वाचा आहे.

A – Fresh / Repeater

  • 1 → Fresh
  • 2 → Repeater

पहिल्यांदा HSC परीक्षा देत असाल तर Fresh. आधी परीक्षा दिली असेल आणि पुन्हा देत असाल तर Repeater.

B – Regular / Private / Isolated / Class Improvement

Regular College student असल्यास साधारणपणे 1 – Regular असते.

इतर options:

  • 2 → Private
  • 3 → Isolated
  • 4 → Class Improvement

C – Exempted / Non-Exempted
तुमच्या case प्रमाणे option निवडा.

D – Course Type

  • 1 → Agriculture
  • 2 → Bifocal
  • 3 → IT
  • 4 → General

E – Foreigner

  • 1 → Yes
  • 2 → No

Regular student असल्यास हे details College कडून confirm करून भरा.

Step 10: Subjects आणि Subject Codes

हा Form मधील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे.

तुमचे registered subjects आणि त्यांचे codes भरायचे आहेत. English compulsory subject, इतर compulsory/optional subjects तसेच Physical Education आणि Environment Education याबाबतची माहिती Form मध्ये असते.

तुमच्या College मध्ये registered असलेले subjects त्याच क्रमाने भरा.

Subject code स्वतः Google करून भरू नका. College च्या online application किंवा records मधून मिळालेला codeच वापरा.

Step 11: Exemption

Previously passed subject साठी exemption claim करणाऱ्या candidates साठी हा भाग आहे.

Exemption लागू असल्यास Form मधील संबंधित माहिती आणि Lang of Ans code भरायचा आहे.

Regular fresh candidate ला हा भाग साधारणपणे लागू होत नाही.

Step 12: Total Exemption

Exemption claim करत असाल तर Total No. of Exemption Claimed मध्ये संख्या द्यायची आहे.

Exemption नसेल तर College कडून confirm करा.

Step 13: Photo आणि Signature

Form मध्ये Candidate’s Photo आणि Signature of Candidate यासाठी sections आहेत.

Photo आणि signature योग्य ठिकाणीच द्या.

Step 14: Previous Examination Details

Form च्या पुढील भागात previous examination ची माहिती विचारली जाते.

यामध्ये Enrollment Certificate Number, SSC आणि XIth चे Exam, Seat Number, Month, Year आणि Board/Junior College यासारखी माहिती लागू असल्यास भरायची आहे.

Last Exam Seat Number हा मुख्यतः Repeaters साठी आहे.

तसेच SSC Maharashtra Board मधून पास झाला आहात का आणि applicable असल्यास Eligibility Certificate Number याची माहिती भरायची असते.

Step 15: आवश्यक Documents

Candidate type नुसार documents लागू होऊ शकतात.

  • Repeater → Previous examination marksheet
  • Isolated → Previous examination marksheet
  • Class Improvement → Previous examination marksheet
  • Private → Enrollment Certificate
  • Other State Board → Eligibility Certificate

Regular fresh Maharashtra Board student ला ही special documents list साधारणपणे लागू होत नाही.

Step 16: Undertaking आणि Signature

शेवटी Undertaking by Candidate/Head of Institution हा भाग असतो.

यामध्ये Board चे rules आणि instructions follow करण्याची सहमती, subject combination ची माहिती आणि examination fee receipt मिळाल्याची acknowledgement यासंबंधी declaration असते.

यानंतर:

Place → Date → Candidate Signature

भरायचे असते.

शेवटी Head of Institution / Principal Form verify करून signature आणि College seal करतात.

Form भरताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

  • Personal details official records प्रमाणेच भरा.
  • Category अंदाजाने select करू नका.
  • Subject आणि Subject Code College कडून confirm करा.
  • Fresh/Repeater status योग्य निवडा.
  • लागू नसलेली माहिती स्वतःहून भरू नका.
  • Form submit करण्यापूर्वी प्रत्येक detail पुन्हा तपासा.
  • Form आणि fee ची प्रक्रिया College कडून पूर्ण झाली आहे याची खात्री करा.

शेवटची तारीख

12वी HSC February–March 2027 परीक्षेसाठी Regular विद्यार्थ्यांच्या application form ची regular-fee window 14 August ते 31 October 2026 आहे. त्यानंतर Board ने late-fee windows देखील दिल्या आहेत.

म्हणून शेवटच्या दिवसाची वाट न पाहता Form ची प्रक्रिया वेळेत पूर्ण करा.

महत्त्वाचे: Form भरताना तुमच्या College कडून मिळालेल्या instructions ला प्राधान्य द्या आणि कोणतीही माहिती अंदाजाने भरू नका. नवीन सूचना असल्यास महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत website वर तपासा.

Rate this post

Leave a Comment